अहमदनगर जिल्हा माहिती | मराठी


इतिहास
संपादन करा

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरोबगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.मोगल बादशहा शहाजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर घेतले. शहरात अहमदनगरचा किल्लारेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल व बाग-ए-बहिश्त महल (सावेडी)अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.
मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसलेलखुजी जाधवराव निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे नगर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असलेले शहर आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेस भारताच्या माजी राष्टपती प्रतिभा पाटील ह्यांच्या हस्ते 'राष्ट्रीय भूजल पुरस्कार' मिळालेला आहे. हा पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार ह्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष श्री मुरलीधर कदम ह्यांनी स्वीकारला.. महत्त्वाचे म्हणजे देशातील फ़क़्त ह्या एकाच नगरपालिकेला हा सन्मान मिळालेल.

Comments

Popular posts from this blog

जळगाव जिल्हा पर्यटन 15 स्थळ ।।

जळगाव जिल्हा माहिती | मराठी |

नाशिक मुख्य स्थान | हिंदी |